spot_img
अहमदनगरAhmednagar News : मी उमेदवार असो वा नसो चारित्र्यवान उमेदवारालाच निवडून द्या,...

Ahmednagar News : मी उमेदवार असो वा नसो चारित्र्यवान उमेदवारालाच निवडून द्या, खा. सुजय विखेंनी काय घातली साद? पहा..

spot_img

मिरजगाव / नगर सह्याद्री : आपण चार वर्षांच्या खासदारकीमध्ये मिरजगाव ते नगर हे अंतर अडीच तासांवरून चाळीस मिनिटांत आणले. मी काम करत राहतो. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार असो अथवा नसो कोणीही उभे राहू द्या, तुम्ही फक्त चारित्र्यवान माणसालाच निवडून द्या असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण मतदारसंघात प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ करून आनंदोत्सव साजरा व्हावा, या हेतूने खा.सुजय विखे यांच्या संकल्पनेतून दि.१८ रोजी कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे साखर व डाळ वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.रमेश झरकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृ.ऊ.बा. समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, दादा सोनमाळी, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, सरपंच नितीन खेतमाळस, भाजपाचे नेते संपत बावडकर, हरिदास केदारी, सुनील यादव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विखे म्हणाले, स्व.बाळासाहेब विखे यांनी मिरजगाव येथे जी जमीन घेतली होती त्या जागेवर आम्ही मागील महिन्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने मिरजगाव येथे पशुसंवर्धन विज्ञान केंद्र या प्रकल्पाकरिता केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाही केली असल्याने लवकरच केंद्राच्या माध्यमातून ५० एकरामध्ये ५० कोटी रूपयांचे पशुसंवर्धन विज्ञान केंद्र उभारण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे हा प्रकल्प मिरजगावच्या विकासामध्ये आणखीन भर पाडण्याचे काम करेल. येथील जनतेने विखे पाटील परिवारावर सदैव प्रेम दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...