spot_img
अहमदनगरAhmednagar News : संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला भेटायला बोलावले, त्यानंतर..

Ahmednagar News : संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला भेटायला बोलावले, त्यानंतर..

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : सोशल मीडियावर झालेले संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेला भेटण्यासाठी बोलविले. विवाहिता भेटण्यासाठी गेल्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली.

याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय कटावकर (रा. भिस्तबाग) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सोबत फिर्यादीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. ते दोघे सोशल मीडियावर बोलत होते. परंतू काही दिवसांपूर्वी फिर्यादी यांनी त्याच्या सोबत बोलणे बंद केले होते.

दरम्यान 20 डिसेंबर रोजी अक्षय याने फिर्यादीला फोन करून भेटायला बोलविले. भेटण्यासाठी आली नाही तर आपल्यातील सोशल मीडियावर झालेले संभाषण तुझ्या नवर्‍याला पाठवून तुझा संसार मोडून तुझे जीवन बरबाद करून टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादी 7 जानेवारी रोजी अक्षय याच्या घरी गेल्या असता अक्षय याने त्यांच्या सोबत गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी सोमवारी (दि. 8) रात्री तोफखाना पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...