अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर तालुक्यातील देहरे गावात (दि.२५ डिसेंबर) एका शेतातील विहिरीत बिबट्या पडला. याची माहिती समजताच वनविभागाने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केले.
स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने बिबट्याला बाहेर काढले. परंतु बाहेर येताच बिबट्याने शेतात धूम ठोकली. स्थानिक नागरिकांत बिबट्याविषयी दहशत असून वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ससेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ, शेळीचा फडशा
जेऊरमध्ये बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. ससेवाडीमध्ये देखील मागील काही दिवसात बिबट्याचे दर्शन होत आहे. रात्री बिबट्याने ससेवाडीत एका शेळीचा फडशा पाडला. वनविभागाला माहिती समजताच त्याठिकाणी जाऊन मृत शेळीचा पंचनामा केला आहे.
त्याठिकाणची परिस्थिती कशी आहे हे पाहून याठिकाणी पिंजरा लावला जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून समजली आहे. परंतु बिबटयाने वस्तीत शिरून शेळीचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.