spot_img
अहमदनगरAhmednagar News : नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याची आढावा बैठक, ३ फेबुवारीची जय्यत...

Ahmednagar News : नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याची आढावा बैठक, ३ फेबुवारीची जय्यत तयारी, ‘हे’ दिग्गज नेते येणार

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळावा पूर्वनियोजन आढावा बैठक अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगर शहर व तालुका परिसरातील कार्यकर्त्यांनी बाहेर गावावरून मेळावासाठी येणाऱ्या लोकांची नाश्ता, चहा, पाणी आदींची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे.

सभास्थळी स्वयंसेवक म्हणून अनेकांनी जबाबदारी घेतली आहे. प्रत्येकाने आपले स्वतःचे घरचे कार्य समजून मेळावा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. नागेश गवळी यांनी केली. यावेळी अंबादास गारुडकर, भगवानराव फुलसौंदर, संजय गारुडकर, बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, दत्ता गाडळकर, नंदू एकाडे, सुभाष लोंढे, बाळासाहेब भुजबळ, माउली गायकवाड, भुजबळ बाळासाहेब आदी उपस्थित होते.

ओबीसींच्या एल्गार मेळाव्यास दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी राहणार आहे. नगर शहरात शनिवारी दि. ३ रोजी क्लेराब्रूस हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी दूपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन आहेत. तर प्रमुख उपस्थितीत आ. गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, आ.प्रकाश शेंडगे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ.राम शिंदे, कल्याणराव दळे, माजी आमदार नारायण मुंडे आदी नेते असतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...