अहमदनगर / नगर सहयाद्री : झेंडीगेट परिसरात कोतवाली पोलिसांनी जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर छापेमारी केली. १३ फेब्रुवारी च्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. अरबाज खलील शेख (वय 23 वर्षे, रा. कोठला), फैजल अस्लम शेख (वय 20 वर्षे, रा. झेंडीगेट), सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी(रा. झेंडी गेट) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
१३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीड वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नगर शहरात झेंडी गेट परिसरात कारी मस्जिद जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालय जवळ एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी, अंमलदार यांना सोबत घेत छापा टाकला. यावेळी पोलीसांनी तीन मालवाहू गाड्या, दोन लोखंडी सत्तूर, 12 गोवंशीय जनावरे, 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा 20 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरील आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पो.कॉ. दीपक रोहोकले, पो.कॉ. सत्यजित शिंदे, पो.कॉ. तानाजी पवार, पो.कॉ. सुरज कदम, पो.कॉ. सोमनाथ केकान, पो.कॉ. शिवाजी मोरे, पो.कॉ. महेश पवार, पो.कॉ. अभय कदम, पो.कॉ. अमोल गाडे, पो.कॉ. संकेत धीवर यांनी केली.