अहमदनगर / नगर सह्याद्री : पुण्यामध्ये नुकतीच ३७ वी राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. पुणे येथील दिघी येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या चाचणीत अहमदनगर जिल्ह्यातून संघाचे नेतृत्व करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र आप्पासाहेब सुद्रिक यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी पुणे येथील दिघी येथे पार पडली.
या चाचणी स्पर्धेत पोहेकॉ राजेंद्र सुद्रिक यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांची या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सध्या त्यांची नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आहे.
त्यांच्या या कामगिरीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सुद्रिक यांच्या निवडीने अहमदनगर जिल्ह्यातून, विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.