spot_img
अहमदनगरAhmednagar News : दहा लाखांसाठी डॉक्टर पतीचे आपल्या पत्नीसोबत भयानक कृत्य

Ahmednagar News : दहा लाखांसाठी डॉक्टर पतीचे आपल्या पत्नीसोबत भयानक कृत्य

spot_img

अहमदनगर : कर्ज फेडण्यासाठी दहा लाख रुपये माहेरून आणावेत यासाठी डॉटर असणार्‍या पतीकडून पत्नीचा छळ झाल्याची घटना घडली आहे. पुष्पा तुषार नवले यांनी याबाबत फिर्याद दिली. पती तुषार गोरख नवले, सासू रंगुबाई गोरख नवले, सासरे गोरख बजाबा नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुष्पा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, १२ जुलै २०१६ रोजी तुषार गोरख नवले यांच्यासह विवाह झाला होता. कौटुंबिक कारणातून आमच्यात वादविवाद होत होते. तुषार नवले हे व्यवसायाने डॉटर असून श्रीगोंदे येथे त्यांचे लिनिक आहेत. त्यांनी विविध बँकेतून माझ्या नावे कर्ज घेतलेले होते.

या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मारहाण केली. पती मला सोडून नगरमध्ये का राहतात? इतके कर्ज का घेतात याबाबत सासू सासर्‍यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पतीने माझ्यावर भरपूर कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी मला १० लाख रुपयांची आवश्यक्ता असल्याने तू तुझ्या घरून पैसे आन अन्यथा कायमची निघून जा असे सांगितले. याला काही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी मला शिवीगाळ मारहाण केली. मी वडिलांना याबाबत सांगितले, ते घरी समजूत काढण्यासाठी आले असता त्यांना व मला बाहेर काढून दिले असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...