spot_img
अहमदनगरAhmednagar News : कंटेनरच्या धडकेत पारनेरमधील एकाच कुटुंबातील चौघे ठार

Ahmednagar News : कंटेनरच्या धडकेत पारनेरमधील एकाच कुटुंबातील चौघे ठार

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील पवार कुंटुंबियांच्या मोटार सायकलला कंटेनरने जोराची धडक दिली. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

दुसऱ्या मोटरसायकलवरील एक जखमी आहे. या अपघातात शेतमजूर अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माउली अनिल पवार (वय ११) व एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा.वडगाव सावताळ ता.पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी नगर कडे जाणाऱ्या कंटेनरने पुढे चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. यात एकाच दुचाकी वरील चौघांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा.पांगरमल, ता.नगर) हे जखमी झाले.

अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. घटनेची माहिती समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले. वडगाव सावताळ येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने गावावर दुःखाची छाया पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...