spot_img
अहमदनगरAhmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

Ahmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय 20, रा. पाटोदा, ता. जामखेड), कुणाल जया पवार (वय 22, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व गुन्ह्यात वापरलेली इको कार ताब्यात घेण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी : फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (वय 40, रा. भवरवाडी, ता. जामखेड) हे लेबर मुकादम आहेत. त्यांचेकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दीड वर्षांपूर्वी मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारासह ३ मार्च रोजी फिर्यादीस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्या. यात फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत झाली होती.

ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते. पोनि दिनेश आहेर यांनी दिनांक 3 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव व अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे व भरत बुधवंत आदींचे पथक नेमून गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सूचना देत पथकास रवाना केले.

पथकाने घटना ठिकाणास भेट देत 2 दिवस घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची माहिती घेतली. आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवनात लपून बसलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जात कारवाई केली. तेथे कुणाल जया पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याचे बाबत माहिती घेऊन त्यास जामखेडमधून अटक केली. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदर विखे पाटलांचे पारनेरकराना मोठे आश्वासन? नेमकं काय म्हणाले, पहा..

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर शहराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक कोटी ८१...

जमीन लाटण्याचा डाव फसला? मालकाच्या फिर्यादीवरून इतक्या जनावर गुन्हा दाखल

श्रीगोंदा । नगर सहयाद्री तालुक्यातील लिंपणगाव येथील खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला...

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याच्या सभेत राडा! कुठे घडाला प्रकार?

नांदेड | नगर सह्याद्री काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समजााच्या...

रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवार नेमकं म्हणाले काय, पहा..

बारामती | नगर सह्याद्री वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात...