spot_img
अहमदनगरAhmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी 'या' आरोपींचे जामीन...

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी ‘या’ आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर येथील नगर अर्बन बँकेच्या २५१ कोटींच्या घोटाळा प्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. यातील संचालक, अनिल चंदुलाल कोठारी (रा. माणिकनगर), अशोक माघवलाल कटारिया, (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारने, जि. अहमदनगर), तज्ञ संचालक शंकर घनशामदास अंदानी (रा.भगत मळा, सावेडी, अहमदनगर) यांचा जमीन अर्ज कोर्टाने नामंजूर केला आहे. वरील आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते, आता हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सन २०१४ ते २०१९ या काळात सदर आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्र, मिळकतीचे बनावट अहवाल इतर बनावट कागदपत्रे तसेच अनेक प्रकरणे मंजुर केली. सदर आरोपी यांचे खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे दिसून येत आहे. तसेच ऐपत नसताना अनेक कर्ज मंजुर केलेली दिसत आहे. सदर फॉरेन्सीक ऑडीटमध्ये अनेक कर्ज प्रकरणात आरोपीचा सहभाग दिसून येत आहे.

यातील आरोपी हे संचालक असताना गैरव्यवहार केला आहे. तसेच तज्ञ संचालक शंकर अदानी याचे खात्यावर आठ लाख रूपये आल्याचे दिसून आले आहे. सदर प्रकरणात अर्बन बँकेचे अनेक संचालक फरार आहेत. तसेच अशोक कटारिया यांचे खात्यावर ४५ लाख रूपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सरकार पक्षाच्यावतीने असा युक्तीवाद करण्यात आला. या जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके व मंगेश दिवाणे यांनी युक्तीवाद केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...