अहमदनगर / नगर सह्याद्री : अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य, रेखीव व आकर्षक मंदिर पूर्णत्वास येत आहे. या मंदिराची हुबेहूब चांदीची छोटी प्रतिकृती नगरमधील एका सुवर्ण पेढीच्या कारागिरांनी घडवली आहे.
श्रीराम मंदिरावर असलेल्या नक्षिदार कोरीव कामा प्रमाणेच कोरीव काम या चांदीच्या मंदिरावर नाजूकपणे करण्यात आले आहे.
याबद्दल माहिती देताना सुवर्णपेढीचे संचालक म्हणाले, पूर्णपणे चांदीत घडवलेली ही श्रीराम मंदिराची प्रतिकृती ६०० ग्रॅम वजनाची असून ते घडवण्यास कारागिरांना १० ते १२ दिवसांचा अवधी लागला आहे. श्रीराम मंदिराची चांदीची प्रतिकृती अयोध्येत पुन्हा श्रीराम मंदिर होत असल्याच्या आनंदाप्रती घडवण्यात आली आहे.