spot_img
अहमदनगरAhmednagar News : सर्व देवी-देवतांनी चांगलं करण्यासाठी मोदींची नेमणूक केली ! गायक...

Ahmednagar News : सर्व देवी-देवतांनी चांगलं करण्यासाठी मोदींची नेमणूक केली ! गायक सुरेश वाडकर शिर्डीत साईचरणी लीन

spot_img

शिर्डी / नगर सह्याद्री : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी आज सोमवारी शिर्डीत येत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी थोडक्यात काही गोष्टींविषयी भाष्य केले. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला.

त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, असे स्पष्ट केले. त्यांना मराठा आरक्षणावरुन राज्यात दुफळी माजत असल्याबद्दल विचारले. तेव्हा वाडकर यांनी म्हटले की, साईबाबांनीच मोदीजींना प्रधानमंत्रीपदी बसवलंय आहे. मोदींजी आता सर्वकाही व्यवस्थित करणार आहे. सर्व देवी देवतांनी आणि बाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केलीय. ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठी केली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुरेश वाडकर भावुक
सुरेश वाडकर यांनी सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. खूप वर्षांनी येणं झाले आहे. ते आता आईची शिर्डीला येण्याची प्रखर इच्छा होती. त्यामुळे आलो आहे. 1967 पासून मी साईबाबांच्या दरबारी येतो. साई दर्शनानंतर मला फक्त रडायला येत आहे. बाबांकडे मी काहीच मागत नाही. बाबांनी काहीही न मागता सगळं देतात असं म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...