spot_img
अहमदनगरअहमदनगर : शहरात 'येथे' तलवारी, गुप्ती अन...पोलिसांची मोठी कारवाई

अहमदनगर : शहरात ‘येथे’ तलवारी, गुप्ती अन…पोलिसांची मोठी कारवाई

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
घरामध्ये तलवारी, गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली.तुषार अर्जुन हरेल (वय २७ वर्षे) अर्जुन विष्णू हरेल (वय ६३ वर्षे) (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड अहमदनगर) असे आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : २ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये आरोपी तुषार व अर्जुन या दोघांनी त्यांच्या घरात अवैधरित्या तलवारी व गुप्ती ठेवल्या आहेत. माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तेथे जात छापा टाकला. त्यांच्या घरामध्ये बेडखाली दोन तलवारी व एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकाँ तनविर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, ए पी इनामदार, पोकाँ अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...