spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! 11 दरोडेखोरांना केले जेरबंद, निघाले होते दरोडा टाकायला, पण...

अहमदनगर ब्रेकिंग ! 11 दरोडेखोरांना केले जेरबंद, निघाले होते दरोडा टाकायला, पण तितक्यात…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर मधून मोठी बातमी आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत 11 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. शनीशिंगणापूर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 53 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की, राहुरी ते अहमदनगर रोडवरील शनीशिंगणापूर फाटा या ठिकाणी 10 ते 15 इसम दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेले आहेत.

याची खात्री करून त्यांनी तात्काळ पोलीस पथक त्यादिशेने रवाना केले. पथक त्याठिकाणी जाताच त्यांना अंधारात काही इसम बसलेले दिसले. पोलिसांची छापा टाकत धरपकड सुरु केली. त्यात 3 इसम फरार झाले. पोलिसांनी इतरांना ताब्यात घेतले. राहुल किशोर भालेराव, संतोष सुखराम मौर्या, सागर विश्वनाथ पालवे, बबलु उर्फ दानिश शौकत शेख,आदिनाथ सुरेश इलग, रितेश सुरेश दवडे, दीपक महादेव साळवे,

रमेश भाऊसाहेब वाकडे, प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी, मिलींद मोहन सोनवणे, अविनाश कारभारी विधाते अशा ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दादा खंडु गांगुर्डे, शिवाजी मिठु शिंदे , संतोष शेषराव निकम हे फरार झाले.

पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस, तलवार,2 सुरे, चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, स्विफ्टकार, अल्टोकार, युनिकॉन मोटार सायकल, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर असा 8,53,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...