spot_img
अहमदनगरAhmednagar : पारनेरमधील वाळवणे ते रुईछ्त्रपती रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभाग सुस्त

Ahmednagar : पारनेरमधील वाळवणे ते रुईछ्त्रपती रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभाग सुस्त

spot_img

 सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वाळवणे ते रुईछ्त्रपती रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अत्यंत त्रास होत आहे. या समस्येकडे लक्ष द्यायला ना पुढाऱ्यांना वेळ आहे ना बांधकाम विभागाला. येथील नेतेमंडळी फक्त मतदाना पुरताच आमचा वापर करून घेत आहेत असा आरोप येथील नागरिकांनी केला.

रुईछ्त्रपती येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे. या आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी नागरिक, वृद्ध, शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागतो. शेतकऱ्यांना त्यांचा माल मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, अहमदनगर, पुणे येथे घेऊन जाण्यासाठी तसेच दुग्ध व्यावसायिक, कंपनी कामगार आदींची  या रस्त्यावर म़ोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून मणकादुखी, पाठदुखी असे आजार उद्भवू लागले आहेत.

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पठारे वस्ती ते रूईछत्रपती फाटा या एक किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर पायी चालणे देखील अवघड झाले आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकी स्वार  घसरून पडले आहेत.

अनेक छोटे मोठे अपघात देखील याठिकाणी झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी रुईछ्त्रपतीचे सरपंच डॉ. मच्छिंद्रनाथ दिवटे, वाळवणेचे सरपंच संगीता गोरक्षनाथ दरेकर आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...