spot_img
ब्रेकिंगAhmednagar: सीए मर्दा दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग, नेमकं प्रकरण काय? पहा..

Ahmednagar: सीए मर्दा दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग, नेमकं प्रकरण काय? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री- शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय ५७, रा. रिद्धीसिद्धी कॉलनी) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, शहर बँकेच्याच दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात मागणी केली. त्याला परवानगी मिळाल्याने मर्दा याला दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग केल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. नीलेश शेळके याच्यासह काही डॉटरांनी एकत्र येऊन नगर शहरात ’एम्स’ नावाने रुग्णालय सुरू केले होते. त्याच्या यंत्रसामुग्रीसाठी शहर बँकेकडे कर्ज प्रकरण करण्यात आले होते. मात्र यामध्ये फसवणूक झाली तसेच अपहार केल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. राहुरीच्या डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूरच्या डॉ. उज्वला रवींद्र कवडे व नगरचे डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी तक्रारी केल्या होत्या.

सुरुवातीला मर्दा याला सिनारे यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आता न्यायालयाच्या परवानगीने त्याला कवडे यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात वर्ग केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन पारनेर/प्रतिनिधी : पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या...