spot_img
ब्रेकिंगAhmednagar Breaking : दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली, आरोपी सगळे २२ वर्षांच्या...

Ahmednagar Breaking : दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली, आरोपी सगळे २२ वर्षांच्या आतले.. सव्वा सहा लाखांच्या दुचाकी जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. नगर शहर, उपनगरातून दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून सहा लाख 15 हजार रूपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात.

तोफखाना पोलिसांनी ही कारवाई करत करण मनोज पवार (वय 22 रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी, नगर), उमेश दिलीप गायकवाड (वय 19 रा. नाना चौक, ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) व मनोज गोरख मांजरे (वय 22 रा. कल्याण रस्ता, शिवाजीनगर, नगर) याना अटक केली आहे. शहरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. नागरिकांनी देखील चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती.

पोलिसही यांच्या शोधात होते. दरम्यान तोफखाना पोलिसांना माहिती मिळाली की करण पवार, उमेश गायकवाड व मनोज मांजरे हे दुचाकी चोरून त्याची विक्री करत आहे. पथकाने त्या तिघांचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांनी नगर शहर, उपनगरातून सात दुचाकी चोरी गेल्याची कबूली दिली.

त्यातील दोन दुचाकीची विक्री केली होती. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, दिनेश मोरे, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे,

वसीम पठाण, अहमद इनामदार, सुरज वाबळे, भानुदास खेडकर, सचिन जगताप, सतिष त्रिभुवन, सतीष भवर, संदिप गिर्‍हे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सुमीत गवळी, गौतम सातपुते, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास अंमलदार धामणे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या...