अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर तालुक्यातील एका गावातील महिला सरपंचांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी रावसाहेब यादव नेटके, गणेश गोरख ससाणे, बॉबी नेटके, दीपक नेटके, अतुल नेटके, राणा नेटके (सर्व रा.शेंडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रावसाहेब यादव नेटके व गणेश गोरख ससाणे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी : १५ फेब्रुवारीला ४ वाजण्याच्या सुमारास सदर सरपंच गावातील कचरा टाकण्याकरिता एका वस्तीवर खड्डा करत होत्या. तेथे वरील आरोपी आले. त्यांनी सरपंचास इथे खड्डा करायचा नाही असे असे सांगितले. सरपंचानी काम थांबवत खड्डा बुजविला. रावसाहेब यादव नेटके याने त्यांना ‘तू लय कामवाली झालीस’ असे म्हणत शिवीगाळ केली. लज्जास्पद वर्तन देखील केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.