spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : पतीने केला पत्नीचा खून, मृतदेह घराजवळ पुरला ! ...

Ahmednagar Breaking : पतीने केला पत्नीचा खून, मृतदेह घराजवळ पुरला ! आरोपी ताब्यात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :
Ahmednagar Breaking  : अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद होऊन पतीने पत्नीचा निर्घृण खून केला. मृतदेह कापडात गुंडाळून घराशेजारी पुरून टाकला.

त्यानंतर पत्नी हरवल्याची तक्रारही त्याने दिली होती. ही घटना श्रीगोंदे तालुक्यातील पारगांव सुद्रीक याठिकाणी घडली. ज्ञानदेव ऊर्फ माउली पोपट आमटे (वय 33, रा. पारगांव सुद्रीक, ता.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. रुपाली ज्ञानदेव आमटे असे मृत पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपीस गुजरातमधून अटक केली आहे. अधिक माहिती अशी : फिर्यादी रोहित संतोष मडके यांनी त्यांची बहीण रुपाली हिचा पती ज्ञानदेव आमटे याने अनैतिक प्रेम संबंधाबाबत जाब विचारल्याचा रागातून खून केला व तिचा मृतदेह घराजवळ पुरळ आहे, परंतु त्याने हरवल्याची खोटी तक्रार दिली अशी फिर्याद दिली.

त्यानुसार 18/11/2023 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार केले. शोध घेत असताना गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्या ठिकाणी जात आरोपीस ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो कंत्राटी व्यवसाया निमित्त वेळोवेळी बाहेरगावी जात असल्याने पत्नी रुपाली ही त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन वारंवार वाद घालत असे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी रुपाली ही याच कारणावरुन वाद घालत होती. त्याने रागाच्याभरात तिचे नाक तोंड, गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह घराजवळ खड्डयात पुरून टाकला. व ती हरवली असल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिल्याची कबुली त्याने दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...