राहुरी। नगर सहयाद्री
राहुरी तालुयातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून झाला आहे. वकील दाम्पत्याचे मृतदेह राहुरी तालुयातील उमरे येथील एका विहिरीमध्ये आढळले. २५ जानेवारीला हे हत्याकांड घडले. ऍड. राजाराम जयवंत आढाव आणि ऍड. मनीषा राजाराम आढाव असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघे मानोरी येथील रहिवासी असून दोघे राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते.
२५ जानेवारीला दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयामध्ये ते होते. दोनच्या दरम्यान ते अहमदनगर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांनी त्यांच्या पत्नी मनीषा यांना आणण्यास पाठवले. त्यानंतर हे दाम्पत्य बेपत्ता झाले. २६ जानेवारीला पहाटे दोनच्या दरम्यान ऍड. राजाराम आढाव यांची चारचाकी गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात आढळली होती. पोलीस पथक गाडीजवळ पोहोचले, त्यावेळी तिथे आढाव यांच्या गाडीजवळ दुसरी एक डस्टर गाडी उभी होती. मात्र पोलिसांची गाडी आलेली पाहताच ती गाडी वेगामध्ये निघून गेली. घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आढाव दाम्पत्याचा शोध सुरु केला. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने या डस्टर गाडीचा शोध घेत त्या आधारे किरण आणि आणखी एक असे दोघे ताब्यात घेतले.
असा केला खून
दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्यांनी सुरवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु पोलिसी खाया दाखवताच त्यांनी कबुली दिली. २५ जानेवारीला दांपत्याचे अपहरण करून त्यांना मनोरी येथील घरी घेऊन गेले. रात्री त्यांचा खून करून त्यांचे मृतदेह दगड बांधून स्मशानभूमी जवळील विहिरीत टाकून दिले, अशी माहिती दोन्ही आरोपींनी दिली.
माहेरील संपत्तीवरून वाद
या हत्येत आणखी काही लोक सहभागी असल्याचा संशय आहे. ते पसार आहेत. त्यांचा शोध घेतला जातोय. मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून हत्या झाली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.