अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माळीवाडा बस स्टँड समोरील हॉटेल पंचरत्नला मोठी आग लागली होती.
महापालिकेच्या दोन अग्निशमनच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली आहे. अहमदनगरमधील माळीवाडा बस स्टँड समोरील हॉटेल पंचरत्नला सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली. या लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. या आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अहमदनगर महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना आग विझवण्यात यश मिळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. आग त्वरित आटोक्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती.