spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : भर बैठकीत घुसला, शिक्षिकेला दमदाटी करत शिक्षकाला केली मारहाण

Ahmednagar Breaking : भर बैठकीत घुसला, शिक्षिकेला दमदाटी करत शिक्षकाला केली मारहाण

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यात विविध धकाकदायक घडामोडी घडत असतात. आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बैठकीत घुसून महिला शिक्षकांना दमदाटी करत पुरूष शिक्षकांची थेट गच्चांडी पकडत व शाळा सुटल्यानंतर रस्त्यात अडवून मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यातील गुंडेगावच्या केंद्र शाळेत घडली. याप्रकरणी भाऊसाहेब शिंदे विरोधात नगर तालुका पोलीसात गुन्हा दाखल केला गेला आहे.

विजय सुदाम कडूस (रा. कासार मळा, गुंडेगाव) शाळा तुकाईमळा, प्राथमिक शाळा, गुंडेगाव यांनी फिर्याद दिलीये. भाऊसाहेब शिंदे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे, शिवीगळ, जिवे मारण्याची धमकी या कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी गुंडेगावच्या केंद्र शाळेत केंद्रप्रमुख मंदा जगताप यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पोषण आहार अधिक्षक प्रदीप शिंदे,

केंद्रप्रमुख जगताप, शिक्षक संजय शेलार, ईश्वर नागवडे, सुहास बोठे, भाऊसाहेब जाधव, संगीता भुजबळ, दिपस्वी पवार, शुभांगी मोरे, मनिषा भालसिंग, ज्ञानदेव कुसळकर, अलका शिरसागर, मंदा शिंदे, गहिनीनाथ पिंपळे, विलास कदम, प्रतिभा निक्रड, जयश्री दिवटे, पद्मावती धुमाळ आदी शिक्षक उपस्थित राहिले होते. ही बैठक सुरू असतानाच आरोप शिंदे त्याठिकाणी आला.शिक्षक शाळेत उशीरा येतात, शाळेतील पोषण आहाराचा दर्जा खराब आहे असा आरडा ओरडा सुरु केला.

शिक्षक कडूस यांनी आमच्या बैठकीत व्यत्यय आणून नका, अशी विनंती केली. त्यावर आरोपी शिंदे याने तुला काय करायचे, माझी कलेक्टरांसोबत ओळख आहे, तुमची बदलीच करतो, असा दम भरला. त्यावर महिला शिक्षिका धुमाळ यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता शिंदे त्यांच्यावर धावू गेला. त्यावर मी शिंदे याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, माझी गच्चांडी त्याने पकडली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आमची बैठक होवू दिली नाही. त्यानंतर शाळा सुटल्यावर घरी येत असतांना रस्त्यात अडवून पुन्हा शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कडूस यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...