spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! 11 दरोडेखोरांना केले जेरबंद, निघाले होते दरोडा टाकायला, पण...

अहमदनगर ब्रेकिंग ! 11 दरोडेखोरांना केले जेरबंद, निघाले होते दरोडा टाकायला, पण तितक्यात…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर मधून मोठी बातमी आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत 11 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. शनीशिंगणापूर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 53 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की, राहुरी ते अहमदनगर रोडवरील शनीशिंगणापूर फाटा या ठिकाणी 10 ते 15 इसम दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेले आहेत.

याची खात्री करून त्यांनी तात्काळ पोलीस पथक त्यादिशेने रवाना केले. पथक त्याठिकाणी जाताच त्यांना अंधारात काही इसम बसलेले दिसले. पोलिसांची छापा टाकत धरपकड सुरु केली. त्यात 3 इसम फरार झाले. पोलिसांनी इतरांना ताब्यात घेतले. राहुल किशोर भालेराव, संतोष सुखराम मौर्या, सागर विश्वनाथ पालवे, बबलु उर्फ दानिश शौकत शेख,आदिनाथ सुरेश इलग, रितेश सुरेश दवडे, दीपक महादेव साळवे,

रमेश भाऊसाहेब वाकडे, प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी, मिलींद मोहन सोनवणे, अविनाश कारभारी विधाते अशा ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दादा खंडु गांगुर्डे, शिवाजी मिठु शिंदे , संतोष शेषराव निकम हे फरार झाले.

पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस, तलवार,2 सुरे, चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, स्विफ्टकार, अल्टोकार, युनिकॉन मोटार सायकल, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर असा 8,53,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर नगराध्यक्षपदासाठी काथ्याकूट! महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का? नगराध्यक्षपदासाठी जायदा शेख, विद्या गंधाडे यांना संधी

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपदाच्या...

नगरच्या व्यापाऱ्याला १९ लाखांचा गंडा! गुटखा जप्त, हातमापुरात महिलेस मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम..

सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक परस्पर विकले / ​एमआयडीसी पोलिसांत भोपाळ, बुलढाणा, राजस्थान येथील...

‘नगर बाजार समितीचा कारभार अक्षय कर्डिलेंच्या नेतृत्वाखाली चालणार’

माजी सभापती भानुदास कोतकर; बाजार समितीत स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अहिल्यानगर | नगर...

नगरमध्ये ठाकरे सेनेला भाजपचा झटका; महापालिका निवडणूक! माजी उपमहापौरांसह चार नगरसेवक घेणार हाती कमळ!

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षबांधणीचे काम...