spot_img
अहमदनगरAhmednagar : लेकरासाठी पाठीची ढाल ! नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी अंगावर झेलला गारांचा...

Ahmednagar : लेकरासाठी पाठीची ढाल ! नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी अंगावर झेलला गारांचा पाऊस

spot_img

पारनेर / नगर सहयाद्री : रविवारी (दि.२६) झालेल्या गारपीटीने पारनेर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यावेळी एका आजोबांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी गारांचा पाऊस आपल्या अंगावर झेलला. दादाभाऊ पांढरे असे त्यांचे नाव आहे.

गारांपासून आपल्या नातवाचे त्यांनी संरक्षण केले परंतु त्यांची गारपिटीने त्यांची पाठ काळी निळी पडली होती. सध्या या आजोबांची चर्चा गांजीभोयरे व परिसरात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शासन व प्रशासनाच्या वतीने या घटनेची कोणती दखल घेतली गेली नसून साधी चौकशीही पुढार्‍यांनी अथवा अधिकार्‍यांनी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रविवारी निघोज मंडळातील २४ गावांत गारपिटीने शेतकरी उध्वस्त झाला. गांजीभोयरे गावातील पांढरे परिवारातील नाना पांढरे यांचे वडील दादाभाऊ पांढरे हे रविवारी आपली जनावरे रानात चारत असताना अचानक दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात गारा पडू लागल्या. लहान पाच वर्षांचा नातू सोबत असल्याने व जवळपास कुठलाही आडोसा नसल्याने आजोबांनी आपल्या पाच वर्षांच्या नातवाला पोटाखाली धरले व स्वतः गारांचा भडीमार आपल्या पाठीवर झेलला.

वाडीवस्तीवरील इतर काही इसमांना गारपिटीचा फटका बसला. सुमन शहाजी पांढरे ही महिला गारांच्या माराने व बाभळीची फांदी अंगावर पडल्याने बेशुद्ध पडली. गारपीटने हातात आलेली सोन्यासारखी पिके उध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकर्‍यांना द्यावी ही विनंती बळीराजा करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...