spot_img
अहमदनगरAhmednagar: नगरकरांनो पाणी प्रश्न सुटनार 'अमृत' योजनेचे ३० 'डिसेंबर' लोकार्पण होणार

Ahmednagar: नगरकरांनो पाणी प्रश्न सुटनार ‘अमृत’ योजनेचे ३० ‘डिसेंबर’ लोकार्पण होणार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अमृत पाणी योजनेमुळे नगर शहाचा पाणी प्रश्न सुटला आहे. खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत पाणी योजनेचा ३० डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रम स्थळाचा नियोजनाची पाहणी आमदार जगताप यांनी केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुळा धरण येथून १९७२ सालामध्ये नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे. त्या नंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.

पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पडले आहे. फेज टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाया उभारल्या आहेत.

त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे. अनेक वर्षाचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, साहेबान जहागिरदार, इंजि.शिंदे, वैभव वाघ, सागर गोरे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...