अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राहता तालुक्यातील लोणी येथील सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची धारदार शस्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना घडली होती. हा सर्व धक्कादायक प्रकार मध्यप्रदेश मधील खरगोन व बडवांनी जिल्ह्याच्या सीमेवर घडला होता. पोलिसांनी 24 तासांच्या आत हत्यचा उलघडा करत त्याच्या तीन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहे.
अटक केलेले तिन्ही आरोपी कोल्हार येथील रहिवासी असून अकिल नबाब शेख, अन्सार अल्लाउद्दीन पिंजारी व अमजद रशीद (तिघेही रा. कोल्हार, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे असून पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून हत्या करण्याचा कट आठ महिन्यांपूर्वीच आखला होता अशी माहिती देखील समोर आले आहे.
‘असा’ रचला होता डाव..
तीन आरोपींसह सराईत गुन्हेगार उमेश नागरे अजमेर येथे दर्शनासाठी गेला होता. पुन्हा महाराष्ट्राकडे येत असताना खरगोन व बडवांनी जिल्ह्याच्या सीमेवर मयत उमेश नागरे याची शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चार लोकांनी हत्या केल्याची माहिती मयत उमेश नागरे यांचा वाहनचालक अकिल याने पोलिसांना देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांची संशयाची सुई त्यांच्यावर बळावली.घटनेतील फिर्यादी अकिल हा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार निघाला.
या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अकिल हा तीन महिन्यांपासून उमेश याच्या गाडीवर चालक म्हणून कामास होता. उमेश हा सराईत गुन्हेगार असल्याने तो अकिल याला वेळोवेळी औरंगाबाद, पुणे, नाशिक व लोणी येथे बोलावून घेत होता. त्यामुळे अकिल हा वैतागून गेला होता. अकिल हा उमेशकडे न गेल्यास तो त्याला धमकी देत होता की, तुझी बायको व मुलीला पळून घेऊन जाईल असे धमकावत होता. अकिल उमेशच्या त्रासाला कंटाळून गेला होता. त्यामुळे उमेश नागरे याची हत्या करण्याचा कट आठ महिन्यांपूर्वीच अकिल याने आखला होता.
अजमेर येथून घरी येत असताना खरगोन व बडवाणी जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मयत उमेश हा वाहनात पुढील सीटवर झोपलेला असताना पाठीमागील सीटवर बसलेला अन्सार याने उमेशचे दोन हात धरले व अमजद याने उमेशचे हात गाडीतील सील बेल्टने बांधून ठेवत अमजद यानेच धारदार चाकूने उमेशच्या गळ्यावर व छातीवर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली व मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला अल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.