spot_img
अहमदनगरAhmednagar : भाळवणीत अपघात, दोन तरुण ठार

Ahmednagar : भाळवणीत अपघात, दोन तरुण ठार

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : नगर कल्याण महामार्गावर भाळवणी येथे चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार झाले. रविवारी सायंकाळी ८ वाजता हा अपघात घडला. नितीन दगडू नांगरे ( वय ३१ वर्ष, रा.गोरेगाव), कैलास अशोक कोरडे (वय २९ वर्ष, रा.हिवरे कोरडा) अशी मृतांची नावे आहेत.

नितीन नांगरे व कैलास कोरडे हे दुचाकीवरून नगरकडे जात होते. समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दोघांनाही जखमी अवस्थेत तात्काळ पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर चारचाकी चालक गाडी जाग्यावरच सोडून पसार झाला होता. माधव पिरतुजी नांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर कल्याण महामार्गावर हॉटेल गुरुकृपा समोर अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती. हेड कॉन्स्टेबल शैलेश रोहोकले, मृत्युंजय दूत, आदिनाथ भागवत यांच्या प्रयत्नाने वाहतूक सुरुळीत सुरु करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी यावेळी मदत केली.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, अप्पा डमाळे, किरण भापकर करत आहेत. सोमवारी दुपारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरेगाव व हिवरे कोरडा गावावर शोककळा पसरली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार लंके यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच

खा. लंकेंचा आंदोलनस्थळी मुक्काम । डॉक्टरांकडून उपोषणकर्त्यांची तपासणी अहमदनगर । नगर सह्याद्री नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठे यश; 84930 शेतकर्‍यांना मिळणार इतका पीक विमा

संगमनेर । नगर सह्याद्री माजी कृषीमंत्री तथा काँग्रेस विधिंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या...

कोण म्हणतं महाराष्ट्राला काही नाही? फडणवीसांनी यादीच वाचली

नागपूर । नगर सह्याद्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला...

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! सगळा घोळच घोळ; मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश

पुणे / नगर सह्याद्री Pooja Khedkar Case: खासगी कारवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या...