spot_img
अहमदनगरAhmednaagr News : कत्तलखाने सुरूच, पोलीस ऍक्शनमोड वर ! कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या...

Ahmednaagr News : कत्तलखाने सुरूच, पोलीस ऍक्शनमोड वर ! कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या नऊ जनावरांची सुटका

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 75 हजार रुपयांच्या नऊ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सुटका केेली. सोमवारी (दि.18) दुपारी साडेचार वाजता झेंडीगेट परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या जवळ ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरबाज रसुल कुरेशी (वय २७ रा. कोठला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेंडीगेट परिसरात कुरेशी याने कत्तलीसाठी जनावरे आणून डांबून ठेवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.

त्यांनी गुन्हे शाखेच्या प्रमुख महिला सहा. पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस अंमलदार सत्यजित शिंदे, दीपक रोहकले, अनुप झाडबुके, संकेत धिवर, तानाजी पवार, सोमनाथ केकान, अभय कदम, अमोल गाडे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने साडेचारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता लहान-मोठी नऊ जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांची सुटका करत अरबाज कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...