spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: 'ठाकरे गटाच्या नेत्याला मंत्री विखे यांच्या कडून भाजप प्रवेशाचे निमंत्रण'

Ahmadnagar Politics: ‘ठाकरे गटाच्या नेत्याला मंत्री विखे यांच्या कडून भाजप प्रवेशाचे निमंत्रण’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
तुमच्या तालुयाला चांगल्या फलंदाजाची गरज आहे, समोरून कसाही बॉल आला, तरी टोलावता आला पाहिजे, फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा, अशी शाब्दिक फटकेबाजी करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात निशाणा साधलाय. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांना आता एकच संघ निश्चित करण्याचा सल्लाही विखेंनी दिला.

संगमनेर तालुयातील घारगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विखे पाटलांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन एकवीस वर्षांपासून करण्यात येते. यंदाही या स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

स्पर्धेचे औचित्य पाहून विखे पाटील यांनी क्रिकेटच्या भाषेतच राजकीय फलंदाजी करत केलेल्या सूचक वक्तव्याला उपस्थितांनी दाद दिली. या स्पर्धेतून चांगले फलंदाज गोलंदाज मिळाले आहेत. तसेही या तालुयाला चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. फिल्डींगचे काम माझ्यावर सोडा असे विखे म्हणाले. जनार्दन आहेर यांना सल्ला देताना आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा आयपीएल सारखे संघ बदलू नका. आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचा मित्रत्वाचा सल्ला देवून एकप्रकारे भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रणच त्यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...