spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking : श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत का झाली लाठ्याकाठ्यांने हाणामारी?...

Ahmadnagar Breaking : श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत का झाली लाठ्याकाठ्यांने हाणामारी? पहा..

spot_img

पाथर्डी / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आले आहे. अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून बैठकीत वाद झाला व हाणामारी झाली. हाणामारीमध्ये विश्वस्तांसह काही तरुण जखमी झाले आहेत.

यात अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली असून त्यांना उपचारासाठी नगरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजता घडली असून काही जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.

मागील काही दिवसांपासून श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात धूसफूस सुरू होतीच. यामुळे आज (गुरुवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्वस्तांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता अशी माहिती मिळाली आहे.

परंतु या चर्चेदरम्यान दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यात स्थानिक तरुण मध्ये आले. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत पोहोचले. यामुळे या हाणामारीने उपस्थितांत मोठी धांदल उडाली होती. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने तरुणांसह काहीजण जखमी झाले. जखमींना पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी जमली. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...