सुपा । नगर सहयाद्री
नागपूर व बेंगळुरू येथे झालेल्या अखिल भारतीय वायुसेनिक शिबिर २०२५ मध्ये प्रीती देशमुख हिने उल्लेखनीय कामगिरी करत एनसीसी विभागात सुवर्णपदक पटकावले आहे. संपूर्ण देशभरातून आलेल्या १६ राज्यांच्या संघांमध्ये महाराष्ट्राच्या संघाने दमदार कामगिरी केली असून प्रीतीच्या यशाने जिल्ह्याचा व राज्याचा नावलौकिक वाढवला आहे.
रांजणगाव मशीद (ता. पारनेर) येथील सरपंच महेश देशमुख यांची कन्या प्रीती देशमुख हीने हवाई नमुना प्रकारातील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या प्रकारात अतिशय अचूकता, संयम आणि कौशल्य आवश्यक असते. बेंगळुरू येथे झालेल्या अंतिम फेरीत प्रीतीने उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रीतीने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. तिची शिस्त, मेहनत आणि चिकाटीमुळेच हे यश शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षकांनी दिली.
महाराष्ट्राच्या तुकडीच्या भक्कम कामगिरीमुळे सर्वोत्तम मुद्दाम दलाचा चषक अखिल भारतीय सैनिक शिबिरातील सर्वोत्तम हवाई दल हा मान महाराष्ट्र राज्याला सुवर्ण अक्षरणी लिहिण्यासारखा प्रीती देशमुख ने सुवर्णपदकासहित मिळून दिला आहे .प्रीती देशमुखच्या या उज्ज्वल यशाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार काशिनाथ दाते, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले असून, जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णक्षण म्हणून या यशाची नोंद घेतली जात आहे.
प्रीतीचे वडिलांच्या पावलावर पाऊल
प्रीती देशमुखचे वडील महेश देशमुख हे दहावी बारावी परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी होते, पण परिस्थिती अभावी उच्च शिक्षण घेता आले नाही याची मनात आस धरून प्रीतीने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन सुवर्णपदक मिळवले आहे.
डॉ. सुजय विखेंचा फोन
प्रीतीचे यश कळताच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तिला फोन करून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रीतीच्या वडिलांचे डॉ. विखे यांच्याशी असलेले जवळचे संबंधही या क्षणी विशेष ठरले.