अहिल्यानगर । नगर सहयाद्री
दुष्काळाचे सावट असणार्या नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवार दि. (५ मे) रोजी दुपारी पारनेर नगर तालुक्यात पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आवर्तन नसल्याने अनेक पिकांना पाण्याची गरज होती. अशा पिकांना दिलासा मिळाला तर अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान, सोमवार दि. ५ मी रोजी दिवसभर नगरसह तालुक्यात ढगाळ वातावरण होते. पावसाळ्याप्रमाणे आभाळ भरून आले होते. दुपारी ३ च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकवलेला पिकांचे नुकसान झाले आहे.
सध्या महाराष्ट्राचे तापमान वाढले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा जाणवत आहे. महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे वातावरणीय बदल होत आहे. जिल्ह्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.