spot_img
अहमदनगरथंडीने अहिल्यानगर गारठले! वाचा, हवामान विभागाचा अंदाज

थंडीने अहिल्यानगर गारठले! वाचा, हवामान विभागाचा अंदाज

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत तापमानाचा घसरला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच गारठले आहे. नगर शहरातील अनेक भागांत शेकोट्या पेटल्या असून ऊबदार कपडे वापरून लोक थंडीपासून बचाव करीत आहेत. तसेच सकाळच्या थंडीतही लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.

यंदा दिवाळी झाल्यानंतर थंडीला हळूहळू सुरुवात झाली. त्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस तापमानात दररोज घट होतांना दिसत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर मंगळवारी अहिल्यानगरचे तापमान ९.७ अंश इतके नोंदले गेले. शहरात सहाच्या सुमारास अंधार पडत असून, यानंतर थंडीचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे एरव्ही रात्री बारापर्यंत असणारी रस्त्यावरील वर्दळ आता रात्री नऊच्या आतच कमी होताना दिसते आहे.

थंडीच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर यासह गरम कपडे वापरत आहेत. अनेक ठिकाणी सकाळी व संध्याकाळी शेकोटी पेटल्याचे दिसत आहे. पुढील काळामध्ये राज्यात अनके भागांतील तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. राज्यात हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ-उतार होत आहे. तसेच थंडी वाढेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...