spot_img
अहमदनगरअहिल्यानगर हादरले! भाड्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली तरुणी, जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचे...

अहिल्यानगर हादरले! भाड्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली तरुणी, जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचे भयंकर कृत्य

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात एका भाड्याच्या खोलीत महाविद्यालयीन युवतीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. गार्गी गणेश शिंदे (वय १६, रा. तपोवन रस्ता) असे जखमी युवतीचे नाव असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, गार्गी ही पाऊलबुद्ध कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. हल्लेखोराने तिला एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खोलीत रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी गंभीर जखमी गार्गीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला नातेवाईकांनी एका खासगी नोबेल रुग्णालयात हलवले असून, तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया सुरू आहे.

​घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे व पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. आरोपी फरार झाला असून, तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तो यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला नेमका का झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, ते गुलदस्त्यातच आहे. तोफखाना पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मैत्री महागात पडली; तरुणीवर अत्याचार, केडगावमधील युवकाचा प्रताप, वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका...

‘सिस्पे’च्या आरोपींमध्ये केंद्रस्थानी ‘अण्णा’?; सुजय विखे कोणत्याही क्षणी भांडाफोड करण्याच्या तयारीत

सारिपाट / शिवाजी शिर्के जादा परताव्याचे अमिष दाखवून नगर शहरासह पारनेर, श्रीगोंदा तालुका आणि...

माजी आमदार नंदकुमार झावरे पुन्हा विखे पाटलांच्या व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेरच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेत निलेश लंके यांना आमदार करण्यासह त्यांना...

दिवाळीनंतर आचारसंहिता! महायुतीच्या ‘बड्या’ नेत्याने सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन

मुंबई । नगर सहयाद्री:- लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,...