spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार दोन जिल्हाधिकारी!

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार दोन जिल्हाधिकारी!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राज्यात गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय सोयीसाठी आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी जोर धरत आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाची देखील मागणी सातत्याने केली जात आहे. प्रशासकीय सोयीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत, मात्र अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

अहिल्यानगर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा क्षेत्रफळाने किती मोठा हे नव्याने सांगण्याची गरज नाही. असे असतानाही विभाजानचे घोगडे मात्र लटकलेलेच आहे. अशातच राज्यात ३६ जिल्ह्यांचे विभाजन करून महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार असून त्याची अधिकृत घोषणा २६ जानेवारी २०२५ रोजी सरकारकडून करण्यात येणार आहे, अशी एक बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या बातमीमुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात संभ्रमाचे वातावरण आहे.

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील नवीन जिल्हे वाढणार नाहीत मात्र अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे येत आहेत. हे कार्यालय वाढवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्य कामांचा भार कमी होण्यास मदत होईल. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा व्हावा.

सुनावणीसाठी जी प्रकरणे आहेत, त्यावर योग्य कारवाई करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करणार असल्याचं बानवकुळे म्हणालेत. याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या आहेत. सर्व विभागीय महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

समजा दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यात झाले तर त्यांच्या कामांचा भार कमी होईल. तालुक्यांचा कार्यभार विभागाला जाईल. अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना एवढ्या १०० दिवसात तयार करण्याचा विचार सरकारचा असल्याची माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली. कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण हा मात्र कमी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...