spot_img
ब्रेकिंगकृषी उत्पन बाजार समिती 'या' दिवशी राहणार बंद! काय आहे कारण?

कृषी उत्पन बाजार समिती ‘या’ दिवशी राहणार बंद! काय आहे कारण?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे.

शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, सचिव मोहन गायकवाड व नंदू बोरुडे यांनी दिली आहे.

शेतकरी पुत्रांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र होत असताना असोसिएशनने एक दिवसीय बंदचा निर्णय घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. शनिवारी भाजीपाला व कांदा विभागात कोणतेही व्यवहार होणार नसून, कडकडीत बंद पाळला जाणार आहे.

या बंदमध्ये सहभागी होण्याचे आडत व्यापारी व शेतकरी वर्गाला असोसिएशनने आवाहन केले आहे. या बंद बाबतचे पत्र तालुका निबंधकांना देण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...