spot_img
अहमदनगरदुष्काळ प्रश्नावर आमदार लंकेंची आक्रमक भूमिका; दिला हा इशारा, पक्ष, पार्टीपेक्षा...

दुष्काळ प्रश्नावर आमदार लंकेंची आक्रमक भूमिका; दिला हा इशारा, पक्ष, पार्टीपेक्षा…

spot_img

आ. लंके यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पारनेर | नगर सह्याद्री –
नगर जिल्हयात दुष्काळी स्थिती असतानाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नगर जिल्हयातील एकाही तालुक्याचा समावेश नसून या प्रश्नावर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठवू असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी दिला. नगर जिल्हावर या संदर्भात अन्याय झाला आहे. सरकारमध्ये जरी आम्ही असलो तरी पक्ष व पार्टीपेक्षा सर्वसामान्य शेतकरी महत्वाचा असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले आहे.

जिल्हयातील दुष्काळाच्या प्रश्नावर आ. लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेउन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. यावेळी आ. लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हयातील प्रत्येक तालुयाचा आढावा घ्यावा. पारनेर-नगर मतदारसंघासह पाथर्डी, शेवगांव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा राहुरी, नगर तालुका या तालुयातील टंचाईची स्थिती भीषण असल्याचे आ. लंके यांनी निदर्शनास आणून दिले. कृषी आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक घेउन आपण शासनास अहवाल पाठवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आ. लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या इतर जिल्हयात दुष्काळ जाहिर करण्यात येत असताना नगर जिल्हयावर अन्याय होत असून त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्हयाच्या दुष्काळी स्थितीची वस्तुस्थिती त्यांच्यापुढे मांडणार आहोत. तरीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व माहितीचे संकलन करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हयासाठी दुष्काळी उपाययोजना पदरात पाडू घेऊ असे आ. लंके यांनी स्पष्ट केले.

जिल्हयातील बहुतांश तलाव, बंधारे, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे यांच्यात पाणीसाठा नाही. लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असून त्यासाठी टँकर भरायचे कुठे असाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे लंके यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार लंके समवेत अ‍ॅड. राहुल झावरे, शिवाजी पाटील होळकर, सुनिल कोकरे, प्रविण वारुळे आदी उपस्थित होते.

मुख्यंमंत्र्यांनाही निवेदन दिले ः आ. लंके
सरकारमध्ये आपण असतानाही कोणी जर प्रश्न करत असेल तर मला या दुष्काळी परिस्थितीत माझा शेतकरी व जनता महत्वाची आहे. त्यामुळे सरकार पक्ष व पार्टीपेक्षा सर्वसामान्य शेतकरी माझ्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी मत व्यक्त केले आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असून जिल्हाधिकारी  सिध्दीराम सालीमठ यांना भेटून जिल्ह्यातील व तालुयातील वास्तव परिस्थिती बाबत जाणीव करून दिली आहे. तरी पण जिल्ह्याच्या दुष्काळी मदतीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा आ. नीलेश लंंके यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारांसमोर केले पुरावे सादर
आ. नीलेश लंके हे जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांच्याकडे टंचाईसंदर्भात इत्यंभूत माहिती होती. ही माहिती पाहून जिल्हाधिकारी सालीमठही आवाक झाले. ही माहिती कुठून संकलीत केली अशी विचारणाही जिल्हाधिकार्‍यांनी आ. लंके यांच्याकडे केली. त्यामुळे जिल्ह्यांसह इतर तालुयांवर कसा अन्याय झाला याचे पुरावे सादर केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...