मुंबई। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शयता आहे. राज्यात ऑटोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शयता आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून लगबग सुरु होण्याची शयता आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीकडून विधानसभेत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भरसभेत मागणी केली आहे.
राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईत अजित पवार गटाची पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, पहिली निवडणूक संपली आहे. तोच दुसरी निवडणूक सुरु झाली आहे.
आचारसंहिता सुरु होतील. आचारसंहिता सुरु झाल्यामुळे काम थांबतील. माझे मुख्यमंत्र्यांना सांगण आहे की, मार्ग काढायला पाहिजे. जेणेकरून आमदारांना ताकद मिळेल. भाजपने ४०० पारचा नारा दिलाय, त्यामुळे विरोधकांकडून दलित समाजात संविधान बदलणार हे सांगितलं गेलं. ते लोकांच्या मनातून काढण्यासाठी नाकीनऊ आले.
पंतप्रधान मोदींनाही वारंवार संविधान बदलणार नाही हे सांगावे लागत आहे. अजित दादा, पुढील निवडणुकीत योग्य त्या जागा मिळायला पाहिजे. आता झालं ते झालं. पुढील निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळायला पाहिजे. त्यातील किमान ५० ते ६० निवडून येतील, असे भुजबळ पुढे म्हणाले.