मुंबई। नगर सहयाद्री
फेब्रवारी महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात सकाळी थंडीची लाट पाहायला मिळत असून दुपारी मात्र उन्हाळा जाणवत आहे. सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यात पुन्हा ‘अवकाळी’ संकट निर्माण होणार असून पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असूनमहाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.