spot_img
ब्रेकिंगAccident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

spot_img

नागपूर । नगर सहयाद्री-
पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत चालकाने ज्यांना उडवलं त्यातल्या तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणार्‍या चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा असे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास नागपूरच्या झेंडा चौकात ही घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. कारमधून मद्याच्या बाटल्याही ताब्यात घेतल्या आहेत. तसंच या तिघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी ही माहिती एएनआयला दिली.

ज्या कारने आई आणि मुलाला आणि एका पुरुषाला धडक दिली त्या कारचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. इतकेच नाही तर त्याच्यासोबत कारमध्ये असलेले इतर दोन सहकारी सुद्धा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

कार चालकाला दिला चोप
ज्या भरधाव कारने तिघांना जोरदार धडक दिली. त्या कारमध्ये एकूण तीन तरुण प्रवास करत होते. अपघातानंतर यापैकी दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर कार चालक हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले. यावेळी संतप्त जमावाने कारचालकाला बेदम चोप दिला. तसेच त्याच्या कारची तोडफोड सुद्धा केली. कारच्या काचा जमावाने फोडल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...