spot_img
महाराष्ट्रगडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! 'हे' आहे सर्वात...

गडकरींपाठोपाठ अजित पवार व फडणवीस अमित शाहांच्या भेटीला ! ‘हे’ आहे सर्वात मोठे कारण

spot_img

नगर सहयाद्री / मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांनी आधी नितीन गडकरी यांची भेट घेतली. आता ते दिला जाणार आहेत.

या मागे कोणतेही राजकीय नियोजन नाही तर महाराष्ट्रातील निर्माण झालेला कांदा प्रश्न आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. तसेच केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिल्याने कारखानदार व शेतकरी यांना याचा फटका बसणार आहे.

सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल यात शंका नाही. याच कारण असे की, देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर गडगडू लागले आहेत. कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातले विरोधी पक्षदेखील केंद्र सरकारवर टीका करू लागले आहेत.

अशातच राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...