spot_img
ब्रेकिंगPolitics News: अखेर अशोक चव्हाण भाजपवासी

Politics News: अखेर अशोक चव्हाण भाजपवासी

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन देशात व राज्यात काम करेल. राज्य आणि देशाचे प्रगतीत योगदान देण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे. आजवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. विकासाबाबत सकारात्मकच राहिलो. हीच भूमिका घेऊन भाजपमध्ये पक्षाच्या धोरणानुसार प्रामाणिक काम करेन. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागेवर भाजपला यश मिळविण्यासाठी आपला अनुभव पणाला लावू, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनी आज मुंबईत भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीष महाजन आदी यावेळी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि. १२) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

पक्ष प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांचे आभार मानून चव्हाण म्हणाले, आपल्या राज्याची वेगळी परंपरा आहे. कालपर्यंत आम्ही एकमेकांचे विरोधक असलो तरी आमचे राजकारणा पलिकडे संबंध होते. भाजपमधील प्रवेश म्हणजे माझ्या आयुष्याची नवीन सुरूवात आहे. ३८ वर्षाचा माझा राजकीय प्रवास आहे. राजकारण सेवेचे माध्यम आहे, या माध्यमातून ती करण्याचा हेतू आहे.

मला कोणावरही व्यक्तिगत टीकाटिपणी करायची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे. मोदी यांच्या कामामुळे देशभर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा देखील आम्ही केलेली आहे. विरोधी भूमिका ही राजकारणात असते, व्यक्तीगत नसते. पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम केले जाईल. काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत काम केले. आजपासून भाजप देईल ती जबाबदारी पार पाडणार.

त्यांना नेते सांभाळता येत नाहीत: फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशोक चव्हाण यांचा भाजपमधील प्रवेश बिनशर्त आहे. विकासाच्या मुख्य धारेत योगदान देण्याची संधी द्या, असे त्यांनी सांगितले. जमीनीवर असलेले अनेक नेते, कार्यकर्ते यांचाही लवकरच प्रवेश होऊ शकतो. चांगले काम करणार्‍या अनेकांशी आमचा संपर्क सुरू आहे. काँग्रेसला त्यांचे नेते सांभाळता येत नाहीत, याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे. नाना पटोले तर कुठेच एकाजागी टीकत नाहीत.

पहिला दिवस आहे, एस्क्यूज…
पत्रकार परिषदेत बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी अशोक चव्हाण यांच्या तोंडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष, असा उल्लेख झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत हशा पिकला. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, आज माझा पहिला दिवस आहे, त्यामुळे एस्क्यूज करा.

‘आदर्श’चा निकाल आमच्या बाजुने: चव्हाण
आदर्श घोटाळ्याच्या चौकशीतून सुटका मिळावी म्हणून तुम्ही भाजपकडे गेला, अशी टीका होत असल्याबाबत अशोक चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले, याबाबत मी खूप सहन केले आहे. हायकोर्टात आमच्या बाजुने निकाल लागलेला आहे. पुढे जे काही कोर्टात होईल, ते स्वीकारू. त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...