spot_img
अहमदनगरAhmednagar News: नगरमध्ये नियम डावलून जाहिरात फलक! आयुक्त काय म्हणाले पहा...

Ahmednagar News: नगरमध्ये नियम डावलून जाहिरात फलक! आयुक्त काय म्हणाले पहा…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरात प्रमुख रस्त्यांलगत, खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या अवघ्या ३८४ जाहिरात फलकांची नोंद महापालिकेकडे उपलब्ध आहे. जाहिरात फलकांबाबत राज्य शासनाने सन २०२२ मध्ये जारी केलेले नियम डावलून प्रमुख चौकात व रस्त्यालगत मोठ्या जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण टाळण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहितीही मनपाच्या संबंधित अधिकार्‍याकडे नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई येथे वादळामुळे मोठा जाहिरात फलक पडून अनेकांचे बळी गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे अनधिकृत फलकांबाबत माहिती घेतली असता, अशी कोणतीही माहिती मनपाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाने जमिनीवरील व इमारतींवरील जाहिरात फलकांच्या उभारणीबाबत नियमावली दोन वर्षांपूर्वीच निश्चित केलेली आहे.

यात अनेक ठिकाणी जाहिरात फलकांना परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांलगत मनपाने अनेक जाहिरात फलकांना परवानगी देताना हे नियम डावलण्यात आल्याचे चित्र आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक उभारले जात असताना त्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई झाल्याची नोंद नाही. त्यामुळे भविष्यात मुंबई सारखी घटना घडल्यावरच मनपाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, शासनाच्या नियमानुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त रस्ते जेथे एकत्र मिळतात अशा ठिकाणी, पोचमार्गाच्या थांबारेषेपासून पुढील किंवा समोरील बाजूस २५ मीटर इतया अंतराच्या आत, जमिनीवर उभारलेल्या जाहिरात फलकांची दर्शनी बाजू समोर येईल, अशा प्रकारे कोणताही जाहिरात फलक प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे.

असे असतानाही पत्रकार चौकात दर्शनी भागात रस्त्यालगत परवानगी देण्यात आली आहे. तसेच, रस्त्याच्या बाजूच्या दोन फलकांमधले किमान अंतर हे १ मीटरपेक्षा कमी असता कामा नये, असा नियम आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून मनपाने फलकांना परवानगी दिली आहे.

शहरातील होर्डिंगवर महापालिका करणार कारवाई : आयुक्तांचा इशारा
अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई होणार आहे. परवानगी घेण्यात आलेल्या होर्डिंगचे पाच दिवसांमध्ये स्ट्रक्चर ऑडिट चे कागदपत्र सादर करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला. नुकतेच मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटने नंतर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीने आदेश काढत होर्डिंग वर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरात विविध भागांमध्ये अनधिकृत होर्डिंग आहेत तसेच स्ट्रक्चर ऑडिट न झाल्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने तातडीने होर्डिंग मालकाची बैठक घेऊन सूचना देत कागदपत्राची पूर्तता करावी. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...