spot_img
मनोरंजनअभिनेत्री श्वेता तिवारीच दुसरं लग्न मोडलं; कारण आलं समोर..

अभिनेत्री श्वेता तिवारीच दुसरं लग्न मोडलं; कारण आलं समोर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या श्वेताच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले. श्वेताने 2 लग्नं केली, पण दोन्ही वेळा तिचा घटस्फोट झाला. तिचं पहिलं लग्न 1998 मध्ये झालं होतं आणि 8 वर्षांनी तिने घटस्फोट घेतला होता. पण या घटस्फोटासाठी तिला मोठी किंमत मोजावी लागली होती.

घटस्फोटात सेटलमेंट करताना श्वेताने तिचा सुमारे 93 लाख किंमत असलेला मुंबईतील एक फ्लॅट पहिला पती राजा चौधरीला दिला होता. कारण फ्लॅटच्या बदल्यात तो घटस्फोट द्यायलाही तयार होता. राजाच्या या मागणीने श्वेताला मोठा धक्का बसला होता. सेटलमेंटनुसार, राजाला त्याच्या मुलीला हवं तेव्हा भेटता येणार नव्हतं. पण पलकला जेव्हा तिच्या वडिलांना भेटायचं असेल तेव्हा ती भेटू शकत होती. अशा रितीने श्वेता आपला पहिलं नातं संपवलं.

घटस्फोटानंतर श्वेता पुन्हा प्रेमात पडली. तिने 2013 मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केलं. 2016 मध्ये या जोडप्याने मुलगा रेयांशचं स्वागत केलं. पण नंतर या नात्यातही मतभेद झाले. 2019 मध्ये, श्वेताने अभिनवविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली, त्याच वष दोघे वेगळे झाले. तेव्हापासून, श्वेता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच सिंगल मदर म्हणून तिच्या मुलांचे संगोपन करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...