नगर सह्याद्री वेब टीम
Entertainment News : अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री प्रियंका चोप्रा स्टंट करतांना दुखापत झाली आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच तिच्या हेड ऑफ स्टेट’ या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत असताना सेटवर तिचा अपघात झाला. यामध्ये प्रियांकाला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या चेहर्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ओरखडे स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेमुळे प्रियांका चोप्राच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रियंका चोप्रा जोनासने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या चेहर्याचा फोटो शेअर करून जखम दाखवली. फोटोत, चेहरा आणि कपाळाच्या उजव्या बाजूला रक्ताचे ठिपके दिसत आहे. हेड ऑफ स्टेट’मध्ये प्रियांका धोकादायक अॅशन सीन आणि स्टंट करताना दिसणार आहे. सीनचा स्टंट करतांना प्रियांकाला चांगलाच फटका बसला.
फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले आहे की, मागील काही वर्षांत मी जखमांचे किती फोटो पोस्ट केले असतील हे मला माहीत नाही.’ प्रियांकाचा हा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रियांका पुन्हा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री प्रियांका सध्या शूटिंगसाठी फ्रान्समध्ये आहे, तिथून ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तसेच मुलगी मालतीसोबतवेळ घालवत खूप एन्जॉय करत आहे. परंतु, अॅक्शन सीन करतांना जखमी झाल्यामुळे चाहतेही काही प्रमाणात निराश झाले आहेत.