जामखेड | नगर सह्याद्री
जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणार्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणार्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिलांचे खासदार विखेंनी अभिनंदन केले.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकत हा सोहळा अधिक खास बनवला.
या कार्यक्रमात महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. तालुयातील व जामखेड शहरातील असंख्य महिलांनी सहभागी होत या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुयात चर्चा होत आहे.
उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे या कार्यक्रमाकडे बघून सर्वांना समजले. ज्या महिलांचा सन्मान येथे करण्यात आला त्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि त्या दिशेने वाटचाल करावी. मदतीसाठी विखे कुटुंबीय सदैव तत्पर आहे असे संबोधित केले.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता शोभा आरोळे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणार्या बेबी हसीना खान, सामाजिक कार्यकर्त्या उमा जाधव, मनीषा मोहळकर, माधुरी भोसले, गायत्री राळेभात, लक्ष्मीताई पवार, नीलम साळवे, काजल मासाळ, मनिषा वडे, पल्लवी बरबडे, पार्वती खेतमाळस, इंद्रजीत कांबळे, राणी गावडे, जयश्री बेंद्रे आदी कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.