spot_img
अहमदनगरएमआयडीसी परिसरात अपघात; महिला ठार

एमआयडीसी परिसरात अपघात; महिला ठार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. सरिता शरद मेहर (वय 40 रा. सारसनगर, अहिल्यानगर) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरिता मेहर यांचा बुधवारी (27 नोव्हेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात अपघात झाल्याने त्यांना त्यांचे नातेवाईक गिरीष गारदे यांनी खासगी रूग्णवाहिकेतून येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बटुळे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी घोषीत केले. तशी माहिती त्यांनी रूग्णालयात नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार बोरूडे यांना दिली. अंमलदार बोरूडे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...