spot_img
देशमहाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना ! विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली

spot_img

राजस्थान / नगर सह्याद्री : महाशिवरात्रीच्या दिवशीच एका मिरवणुकीत दुर्घटना झाल्याचे वृत्त आले आहे. भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून 14 मुले भाजली.

राजस्थानच्या कोटामध्ये आज (दि.८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठले. अपघाताची माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी देखील रुग्णालयाकडे धाव घेतली.

सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ऊर्जा मंत्री हिरालाल नागर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी मुलांची भेट घेटली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत. सर्वांचे वय 9 ते 16 वर्षे दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विजेचा झटका लागल्याची घटना घडल्यानंतर जखमी मुलांच्या संतप्त कुटुंबीयांनी आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना जोरदार मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...