spot_img
ब्रेकिंगअहमदनगर:'तो' शाळेचा दिवस अखेरचा 'DYSP' चौकात अपघात; विद्यार्थी ठार

अहमदनगर:’तो’ शाळेचा दिवस अखेरचा ‘DYSP’ चौकात अपघात; विद्यार्थी ठार

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-

नगर शहरातून बेकायदेशीर प्रवेश करणार्‍या जड वाहतुकीमुळे डीवायएसपी चौकात घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शेख महंम्मद अनीस खलीद (वय १९ रा. सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

गुरूवारी (दि. २) सकाळी हा अपघात झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शेख सायकलवरून जात असताना त्याला हायवा डंपरने धडक दिली.

पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. शेख महंम्मद अनीस खलीद हा शालेय विद्यार्थी शाळेतून घरी जात असताना डीवायएसपी चौकात १४ टायर डंपरने शेख यास उडवले.

अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नगर शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.

नगर-सोलापूर महामार्गावरून नगरच्या दिशेने येणारी अवजड वाहने अरणगाव बाह्यवळण रस्त्याने, नगर-पुणे व नगर-कल्याण महामार्गावरील वाहने निंबळक बाह्यवळण रस्त्याने व नगर-मनमाड आणि नगर-संभाजीनगर महामार्गावरील अवजड वाहने वडगाव गुप्ता बाह्यवळण रस्त्याने वळवली आहेत.

त्या शिवाय इतर उपाय योजनाही केल्या आहेत. तरी देखील वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे जड वाहतूक सर्रासपणे शहरांत प्रवेश करत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...