spot_img
अहमदनगरParner News: ‘सेनापती बापट’मुळे कुलाबाच्या अर्थकारणाला गती'

Parner News: ‘सेनापती बापट’मुळे कुलाबाच्या अर्थकारणाला गती’

spot_img

माजी आमदार विजय औटी | कुलाबात सेनापती बापट पतसंस्थेचा शुभारंभ

पारनेर | नगर सह्याद्री-

मुंबईमधील कुलाबा बंदर व पारनेरकर हे जुने समीकरण असून सेनापती बापट मल्टिस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून याला पुन्हा उजाळा मिळाला आहे. तर दुसरीकडे सेनापती बापट पतसंस्थेचे चेअरमन रामदास भोसले व त्यांच्या सहकार्‍यांनी कुलाब्यात या नवीन शाखेच्या शुभारंभ करून अर्थकारणाला निश्चित गती मिळणार असल्याचे मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले आहे.

सेनापती बापट पसंतीच्या २९ शाखा शुभारंभ मुंबई येथील कुलाबात माजी आमदार विजय औटी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त शंकर जगताप व चेअरमन रामदास भोसले यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पारनेरकर व मुंबईकर उपस्थित होते.

यावेळी सेनापती बापट मल्टिस्टेट पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अण्णा औटी, मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब झंजाड, कृष्णाजी पवळे, माजी उपनगराध्यक्ष उद्योजक दत्तात्रय कुलट, अविनाश वाघमारे, बाळासाहेब धोत्रे, बाबाजी तनपुरे, अशोकराव पावडे यांच्या सह सर्व संचालक मंडळ कर्जदार सभासद, ठेवीदार, हितचिंतक, संस्था कर्मचारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार औटी म्हणाले की, एकेकाळी पारनेरकरांना रोजी रोटी देण्याचे काम कुलाबा बंदरने केले असून पारनेर तालुयातील अनेक मोठमोठे मत्स्य व्यवसायिक या कुलाबा बंदरात आज मोठ्या कष्टाने उभी आहे. त्यामुळे या कष्टाच्या व मेहनतीच्या पैशाला व अर्थकारणाला गती देण्यासाठी सेनापती बापट पतसंस्थेने काम करावे असे आवाहनही औटी यांनी केले आहे.

पारनेरकरांचा विश्वास सार्थ ठरवणार: चेअरमन भोसले

पारनेरकर आणि मुंबई त्यात कुलाबा हे जुने नाते व समीकरण मानले जात असून कुलाब्यातील मत्स्य व्यवसायिकांसाठी व पारनेकरांसाठी सेनापती बापट पतसंस्था चा शुभारंभ केला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आणि गावाला दोन्ही ठिकाणी सेवा मिळणार असून पारनेवासी यांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे आश्वासन सेनापती बापट मल्टीस्टेटचे चेअरमन रामदास भोसले यांनी शुभारंभ प्रसंगी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर: शिक्षक बनला भक्षक! प्रयोगशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील एका नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर...

कस्टमर केअरला कॉल करणं महागात पडलं!, ४ लाख ६६ हजार खात्यातून लंपास, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ऑनलाइन खाद्य वितरण अ‍ॅपवरून ऑर्डर केल्यानंतर ती न मिळाल्याने गुगलवर...

मला तुझ्या नवऱ्याच्या जागेवर धर!: विधवा वहिनीचा दिराने केला छळ, पारनेर तालुक्यातील प्रकार

पारनेर । नगर सहयाद्री विधवा महिलेच्या दीराने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार...

मेंढपाळाच्या १० बकऱ्या ठार! पारनेर तालुक्यात बिबट्याचा कुटुंबासह तळ

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील पाडळी आळे शिवारात रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता...